हिंदू सणांमध्ये अक्षय तृतीया हा एक सण साजरा केला जातो .या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे .साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया .आपल्या जीवनामध्ये अक्षय लक्ष्मी म्हणजेच न संपणारी लक्ष्मी ,यश ,आरोग्य लाभावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो .तसंच आपल्या पूर्वजांची आठवण या सणाच्या निमित्ताने केली जाते आणि त्यासाठी विशेष पद्धतीने हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारत तसेच नेपाळमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये या सणाचा महत्त्व आहे तसेच जैन धर्मामध्ये देखील या सणाचे धार्मिक दृष्ट्या महत्त्व मानलं जातं.
अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थ
अक्षय म्हणजे कधीही न संपणार. अक्षय तृतीयेला काही भागांमध्ये 'आखाजी' किंवा 'आखात्रीज 'असेही म्हटले जाते .याचा अर्थ ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेला कोणताही चांगलं कर्म त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो असं मानलं जातं .दान धर्म केला जातो आणि त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं अशी धारण आहे.
अक्षय तृतीया केव्हा साजरी केली जाणार 2024
यावर्षी अक्षय तृतीया 10 मे 2024 ,वार -शुक्रवार ,वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाणार आहे.
अक्षय तृतीया सणाचे महत्त्व
अक्षय तृतीया या सणाचं धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या ही महत्त्व आहे .अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो. या दिवशी शुभ कार्याला सुरुवात केली जाते . नवीन घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे किंवा महिला या दिवशी सोन्याची देखील खरेदी करतात . विवाह करण्यासाठी देखील हा मुहूर्त अगदी उत्तम मानला जातो .याच्यासाठी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही. हा दिवस या सर्व कामांसाठी शुभ मानला जातो.
धार्मिकदृष्ट्या अक्षय तृतीया सणाचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसंच आपल्या पितरांची पूजा करून त्यांचेही स्मरण केलं जातं.
अक्षय तृतीया सणाच्या धार्मिक आख्यायिका
परशुराम जयंती
१) अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरा केला जातो .या दिवशी भगवान विष्णूंनी भगवान परशुरामाच्या रूपाने आपला सहावा अवतार या पृथ्वीवर घेतला अशी आख्यायिका आहे आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते.
२) याच दिवशी व्यासमुनींनी महाभारत लिहायला सुरुवात केली अशी ही एक आख्यायिका अक्षय तृतीया या सणाचे विषयी ऐकायला मिळते.
तसंच महाभारतामध्ये महाभारतातील युधिष्ठिराला या दिवशी अक्षय पात्राची प्राप्ती झाली , ज्याच्या मदतीने तो आपला वनवासामध्ये राहत असताना त्यांच्याकडे आलेल्या ब्राह्मणांना प्रसन्न करू शकला .
तसेच याविषयीची आणखीन एक आख्यायिका अशीही आहे की दूशासनाने जेव्हा द्रौपदीचा वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय वस्त्र प्रदान केलं. म्हणजे जे कधीही संपू शकत नव्हतं.
जेव्हा सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला गेला त्या वेळेला त्याच्याकडे त्याला देण्यासाठी मुठभर पोह्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं .पण श्रीकृष्णाने त्याचं हे प्रेम पाहून ते त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याचं सगळं दुःख दारिद्र्य नष्ट केलं. त्याला अक्षय असं सुख प्रदान केलं. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया अशी ही मान्यता आहे.
या दिवशी करण्यासारखे काही खास उपाय.
यावर्षी 10 मे 2024 वार शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे .या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणार किंवा कधीही न संपणार .या दिवशी केला जाणारा दानधर्म, कोणताही धार्मिक कर्म याचं फळ कधीही न संपणार असतं. म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करून आपण सुख शांती समृद्धी आणि धनसंपत्ती प्राप्त करू शकतो यासाठीच काही उपाय दिलेले आहेत.
१) या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते .माता लक्ष्मीची पूजा करत असताना 11 कवड्या लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात .दुसऱ्या दिवशी बांधलेल्या कवड्या आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात. यामुळे आपल्याला अक्षय लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. कारण जशा कवड्यांची निर्मिती समुद्रातून होते तसेच माता लक्ष्मी ही कवड्या समुद्रातून निर्माण झालेली आहे आणि तिला कवड्यांची विशेष आकर्षण असतं. अशी मान्यता आहे.
२) त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं धान्य आणि चंदन मिश्रित पाण्याचे दान केल्यानेही पुण्यप्राप्ती होते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण या वस्तूंचं दान यथाशक्ती करू शकतो त्याचप्रमाणे कपडे चप्पल आणि उष्णतेपासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे देखील दान आपण या दिवशी करू शकतो त्याचेही पुण्य आपल्याला मिळू शकतो. तसेच तसेच जवस गहू तांदूळ या वस्तूंची ही आपण दान करू
३) या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा सात गोमती चक्र समोर ठेवून करावी यानंतर लक्ष्मी यंत्राची स्थापना करावी तसेच 'हुं हुं हुं श्री ब्रं ब्रं फट'या मंत्राचा 51 वेळेस जप करावा.
४) या दिवशी आपल्या इतरांची पूजा करून देखील आपण त्यांना प्रसन्न करू शकतो आणि आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपली सगळी कार्य सहज सिद्धी जातात
(वरील सर्व माहिती ही उपलब्ध स्रोतांच्या आधारावर देण्यात आलेली आहे .या द्वारे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही,)
Comments